रत्नागिरी:- हातखंबा ते कोल्हापूर जाणाऱ्या रस्त्यावर चरवेली येथे उतारात गॅस टॅन्कर ला मागून धडक देवून अपघात करणाऱ्या संशयित पाण्याच्या टॅंकर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामविलास अर्जून सिंग (वय ५०, रा. तालुका परगह जि. खगडीया राज्य-बिहार) असे संशयित पाण्याच्या टॅन्कर चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरिल चरवेली गावच्या उताराच्या रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुज नमीसाहब शेख (वय ३५, रा. सताळा बुद्रुक ता. उदगीर, जि. लातूर) हे आपल्या ताब्यातील गॅस टॅन्कर (क्र. के. ए-०१ ए एच ४०५२) हा हातखंबा ते पाली असा मुंबई गोवा महामार्गावरुन जात असताना चरवेली गावचा उतारात आले असताना मागून येणारा पाण्याचा टॅन्कर (क्र. एमएच- ०८ एबी १८३१ वरिल चालकाने निष्काळजीपणे टॅन्कर चालवून गॅस टॅन्करला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. तसेच या अपघातामध्ये सुरज शेख व रामविलास सिंग हे दोघे जखमी झाले. या प्रकरणी सुरज शेख यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित पाण्याचा टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









