Wednesday, September 16, 2026
spot_img
Home राजापूर नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

तेरवण येथील घटना

राजापूर:- तालुक्यातील तेरवण येथील एका ७५ वर्षीय वृद्धाचा नारळाच्या झाडावरून तोल जाऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रघुनाथ राजाराम सप्रे असे मृत वृद्धाचे नाव असून, या घटनेमुळे सप्रे वठार परिसरात शोककळा पसरली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रघुनाथ सप्रे हे आपल्या घराजवळील आगरमध्ये (बागेत) नारळ पाडण्यासाठी गेले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नारळाच्या झाडावर चढले असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते उंचावरून खाली पडले.
​या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद मृताचे चुलत भाऊ अविनाश आत्माराम सप्रे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. राजापूर पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे.