रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये येथील रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐजाज अल्ताप बावनी (वय २५, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे जखमी स्वाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २५) सकाळी साडेसातच्या सुमारास भाट्ये रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऐजाज बावानी हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एसी ६) घेऊन पावसहून रत्नागिरीकडे येत होते. भाट्ये येथील रस्त्यावर त्यांची दुचाकी स्लिप झाली. या अपघातात ते जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.









