रत्नागिरी:- हातखंबा रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकीने मोटारीला धडक दिली. या अपघात प्रकरणी स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक संदिप जोशी (रा. अंजणारी, जोशीवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे स्वाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १३) सकाळी सहाच्या सुमारास हातखंबा येथील हॉटेल अलंकारच्या अलिकडील रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोटार (क्र. एमएच-०८ ए.जी २३०६) वरील चालक अमोघ उल्हास मुळ्ये हे रत्नागिरी येथून तालुक्यातील कळझोंडी असे जात होते. पानवल फाटा ते हातखंबा येथे रस्त्याचे काम सुरु असताना रस्ता बंद करुन दिशादर्शक बोर्ड लावून वाहतूक हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरु होती. म्हणून मोटार चालक अमोघ मुळ्ये हे हातखंबा ते रत्नागिरी रस्त्याने जात असताना समोरुन एक ट्रक आला व त्या ट्रकला दुचाकी (क्र. एमएच-०८ बी एफ ६६१५ वरिल चालक प्रतिक जोशी यांनी मोटारीला बाजू देताना दुचाकीने मोटारीच्या उजव्या बाजूला धडक देवून अपघात केला. या अपघातामध्ये मागे बसलेली सौ. स्नेहल प्रतिक जोशी हिच्या लहान मोठ्या दुखापतीस कारणीभूत झाला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.








