रत्नागिरी:- शहरातील मच्छीमार्केट जवळीलस आजगावकर कंपाऊड येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सुलभा सुर्यकांत पडवळ (वय ६०, रा. आजगावकर, कंपाऊंड मच्छीमार्केट जवळ, रत्नागिरी. मुळ ः पत्ता माहित नाही) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १६) दुपारी एकच्या पुर्वी जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत सुलभा ही १० जानेवारी २०२६ ला मच्छीमार्केट येथील आजगावकर कंपाऊंड येथे बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. तिला तेथील महिलांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तिचा शुक्रवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









