रत्नागिरी:- करंबेळे-देवरुख (ता. संगमेश्वर) येथे रिक्षावरिल ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये चालकासह त्याची पत्नी व आई जखमी झाली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेदहाच्या सुमारास करंबेळे रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक साईप्रसाद महादेव लिंगायत हे रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ७९७७) सोबत पत्नी सई व आई रेश्मा यांना घेऊन देवरुख येथे जात होता. करंबेळे रस्त्यावर अचानक त्याचा रिक्षावरिल ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये चालक साईप्रसाद याच्यासह पत्नी व आई जखमी झाली. तात्काळ त्यांना उपचारासाठी देवरुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.









