खेड:- फिट येऊन डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृताच्या डोक्यावर काळे-पांढरे केस, कपाळावर व नाकावर खरचटल्याची खूण, मानेवर उजव्या बाजूस स्टारचे गोंदण, उजव्या हाताच्या दंडावर गोंदण व पोटावर खरचटल्याची खूण आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अस्मिता साळवी करत आहेत.









