दुचाकीस्वार जखमी, कार चालकावर गुन्हा
खेड:- मुंबई–गोवा महामार्गावरील कळंबणी परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. रामचंद्र बाबू गुरव (६४, रा. कळंबणी बुद्रुक) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातप्रकरणी कार चालकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामचंद्र गुरव हे दुचाकीवरून कळंबणी येथून भरणे दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या कारने (एमएच ४३ बीवाय ७५१२) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गुरव यांच्या डोक्यासह पायाला गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









