ना. सामंत यांचा 50 वा वाढदिवस उत्साहात साजरा

रत्नागिरी:- रत्नागिरीचे लोकप्रिय पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषामंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस 50 वा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस सोहळा शुक्रवार (दि. 26 डिसेंबर) रोजी रत्नागिरीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा झाला. त्यांच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात सकाळपासूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक आणि हितचिंतकांनी प्रचंड गर्दी केली होती.

मंत्री उदय सामंत यांना शुभेच्छा देण्यासाठी रत्नागिरी शहर तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोक संपर्क कार्यालयात दाखल झाले होते. शिवसेना, भाजपा व इतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लहान-मोठे व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिक यांया प्रचंड उपस्थितीने कार्यालयाबाहेर जणू रांगा लागल्या होत्या. उपस्थितांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन पालकमंत्र्यांना दीर्घायुष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.

कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची गर्दी आणि वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी आलेल्या प्रत्येकाच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे प्रेम स्वीकारले. जनतेने दिलेले हे प्रेम व आशीर्वाद हेच आपल्या कामाची खरी ऊर्जा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्ह्यातील विकासकामे आणि समाजकार्याला गती देण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे आणि संलग्न संघटनांचे सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.