नाचणे येथे सार्वजनिक ठिकाणी विदेशी दारु पिणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- नाचणे येथील आयटीआय च्या मागिल कच्चा रस्त्यावर माळरानावर झाडीझुडपात विदेशी दारुचे सेवन करणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र श्रीधर मयेकर (वय ५३, रा. सतीवाडी, सोमेश्वर रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) दुपारी दोन च्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे परवाना नसताना विदेशी मद्य प्राशन करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हवालदार आशिष भालेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.