रत्नागिरी:- सेन्ट्रींग चे काम करणाऱ्या बिहार येथील तरुणाना मद्याच्या नशेत उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
ब्रीजेश बुटी चौधरी (वय २८, सध्या रा. एसटी बसस्थानक जवळ, साखरपा, ता. संगमेश्वर मुळ ः माधवपूर, तरवारा जि. शिवान राज्य बिहार) असे उंदिर मारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) सकाळी आठच्या सुमारास साखरपा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिहारी तरुणाने मद्याच्या नशेत उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. त्याला तात्काळा साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.









