रत्नागिरी:- तालुक्यातील सैतवडे येथील नेपाळी नवजात बालकाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या बालकाला तपासून मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी (ता. ५) डिसेंबरला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेपाळी चक्रबहाद्दुर खर्गेंन्द्रबहाद्दूर ( रा. मुळ नेपाळ, सध्या रा. सैतवडे, अल्ताफ खतीब यांच्या बागेत, रत्नागिरी) यांची पत्नी सिता चक्रबहाद्दुर (वय ४०) हि गरोदर होती. ४ डिसेंबरला रात्री नऊ वाजता जेवण करुन ती झोपली असताना शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास तिच्या पोटात दुखू लाल्याने तिला उपचारासाठी खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथे तिची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसुती केली. तिला मुलगी झाली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला अधिक उपचारासाठी ऑक्सिजन लावून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चक्रबहाद्दूर यांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.









