पोलीस तपास सुरु
साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भंडारवाडीतील स्मशानभूमीत केळवली (ता. लांजा) येथील प्रकाश गणू कोटकर (वय ५५) यांचा मृतदेह सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.खिशात सापडलेल्या आधार कार्ड मुळे या मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील शैलजा पवार साखरपा सरपंच शशिकांत लिंगायत यांनी घटनास्थळी जाऊन खातरजमा करून पोलिसांशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे सहाय्यक पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे स्वप्नील कबळे गणेश सुतार यांनी घटनास्थळी जाऊन पोलीस कारवाई सुरु करून मृतदेह शव विच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले असून पोलीस तपास सुरु आहे









