मिरजोळे येथे सिमेंटचा खांब तुटून दोन कामगार पडून जखमी

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे हनुमाननगर येथे सिमेंटचा विजेचा खांब अचानक तुटल्याने त्या खांबावर काम करणारे दोन कामगार खाली पडून जखमी झाले. ही दुर्घटना गुरुवार 18 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वा.सुमारास घडली.

साधन बुध्दिब चौधरी (24) व फूलचंद सुखदेव चौधरी (23,रा.मिरजोळे,रत्नागिरी) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. साधन आणि फूलचंद हे दोघेही गुरुवारी दुपारी मिरजोळे हनुमाननगर येथे विजेचे 33 केव्ही ताणण्याचे काम करत होते. दोघेही या कामासाठी सिमेंटच्या खांबावर चढलेले होते. हे काम करत असताना सिमेंटचा खांब तुटल्याने दोघेही खाली पडून जखमी झाले.