Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी नर्मदा सिमेंट रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने दोघे तरुण जखमी

नर्मदा सिमेंट रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने दोघे तरुण जखमी

रत्नागिरी:- मैत्रीणीला भेटण्यासाठी गणपतीपुळे येथे जाणाऱ्या तरुणांचा साळवी स्टॉप ते गणपतीपुळे रस्त्यावरिल नर्मदा सिमेंट रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

निखिल प्रकाश वाघमारे (वय २२, रा. महादेव नगर, जांभुळफाटा-रत्नागिरी. मुळ ः गांधीनगर आंबेजोगाई, बीड) यश रवींद्र घोगरे (वय २०, रा. घाटकोपर-मुबंई) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. ६) रात्री साडेदहाच्या सुमारास नर्मदा सिमेंट रस्त्यावर घडली. हे दोघे समाज कल्याण वसतीगृह-कुवारबाव येथे शिक्षणासाठी आहेत. ते यश फाऊंडेश येथे नर्सिंगचा कोर्स करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी यश घोगरे हे दुचाकी (क्र. एमएच-४७ एए ८०५०) सोबत निखिल वाघमारे याला घेऊन गणपतीपुळे येथे गेलेल्या मैत्रीणाला भेटण्यासाठी जात होते. साळवीस्टॉप ते निर्मदा सिमेंट रस्त्यावरुन जात असताना औरंगाबादकर हॉस्पिटल येथे अचानक यश घोगरे यांचा दुचाकीवरिल ताबा सुटला दुचाकी स्लिप झाली. या मध्ये दोघे जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले.