रत्नागिरी:- खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीला जेरबंद करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील आठ प्रमुख संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळावरील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेली टोळी ही कुवारबाव परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. कुवारबाव पोलिस चौकीत असलेल्या पोलिसांना या टोळीबाबत संशय आला आणि त्यांनी अधिक चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. बुधवारी रात्री उशिरा पर्यंत या टोळीकडे चौकशी सूरु असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.