देवरूखात नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत

देवरूख:- देवरूख नगर पंचायत निवडणूकत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून दंड थोपटलेल्या श्रेया संतोष केदारी यांना नमविण्यात वरीष्ठांना यश आल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला व त्याचे पती संतोष केदारी यांनी प्रभाग २ मधून ही आपला अर्ज मागे घेतल्याने भाजपाचा मार्ग सुकर झाला आहे.

आता नगराध्यक्ष पदासाठी मृणाल शेट्ये भाजपा, सबुरी थरवळ (उबाठा), दिक्षा खंडागळे (आप), स्मिता लाड (शहर विकास आघाडी), वैष्णवी मोरे (अपक्ष) अशी पंचरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे. तर प्रभाग १ मधून कांगणे इशीता योगेश अपक्ष,
प्रभाग २ मधून संतोष कृष्णा केदारी अपक्ष,
प्रभाग १० मधून रेडीज सुरज सतीष अपक्ष, प्रभाग ३ मधून कदम अर्चना विकी, प्रभाग १६ मधून
कोटकर सुभाष बारक्या, तावडे वसंत रामचंद्र,
तावडे मनोज लाल्या, गजबार अजय विजय
सर्व अपक्ष यांनी शुक्रवारी अखेरच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले..