मालगुंड येथे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील रहाटाघरवाडी-मालगुंड येथे घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या वृद्धाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दिलीप शंकर गावडे (वय ६४, रा. रहाटघरवाडी-मालगुंड, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १६) सकाळी आठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत दिलीप गावडे हे सायंकाळी पाचच्या सुमारास घरातील किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांना अजित गावडे यांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.