रिक्षाला धडक लागल्याच्या रागातून दोघांना मारहाण

रत्नागिरी:- शहरातील घुडेवठार येथे रिक्षाला धडक लागल्याच्या रागातून टेम्पोचालकासह दोघांना मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गौरव सदानंद चव्हाण (४०, रा. कर्ला, भंडारवाडी) व नरेश थापा (रा. कर्ला) अशी मारहाणीतील जखमींची नावे आहेत.

याप्रकरणी शहर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला. सुधीर घुडे (रा. घुडेवठार) बाबा घुडे व अन्य एक अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. माहितीनुसार, सुधीर याच्या रिक्षाला काही दिवसांपूर्वी गौरव चव्हाण यांच्या टेम्पोची धडक बसली होती. याचा राग सुधीर याच्या मनात होता. १३ नोव्हेंबर रोजी गौरव हा टेम्पो घेऊन गेला असता त्याला व क्लिनर नरेश थापा यांना मारहाण करण्यात आली.