इच्छुकांची भाऊगर्दी; तिकिट वाटप करताना नेत्यांची कसरत
चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण नगरपालिका निवडणूककडे सर्वांचे लक्ष वेधले आहे त्यातच सोमवारी महाराष्ट्र मध्ये प्रथमच चिपळूणमध्ये महायुती एकत्रित निवडणूक लढवणार असे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नेमका कोण याबाबत प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे त्यामुळे युती अभेद राहणार की तुटणार अशीच चर्चा सुरू आहे.
तसेच आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत त्यातच माजी रमेश भाई कदम स्वतः नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार असल्यामुळे अनेकांसमोर पेच निर्माण झाला आहे अजूनही बैठका सुरू असून महायुती व महाविकास आघाडी यांचा उमेदवार जाहीर झाला नाही त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
भाजपकडून विजय चितळे, परिमल भोसले, सुरेखा खेराडे, मंगेश उर्फ बाबू तांबे व शिवसेनेकडून उमेश सकपाळ, सुधीर शिंदे तर राष्ट्रवादीकडून मिलिंद कापडी असे अनेक दिग्गज महायुतीचे नगराध्यपदाचे दावेदार आहेत.
तसेच २८ जागांसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी दिसून येत आहे उमेदवारी अर्ज दाखल करायला तीन दिवस होऊन अद्याप एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नाही मात्र येत्या दोन दिवसांमध्ये उमेदवार अर्ज दाखल होतील असे चिन्ह दिसून येत आहे त्यातच माजी आमदार रमेश भाई कदम स्वतः नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्यामुळे अनेकांची गोची झाली आहे.
त्यातच पालकमंत्री उदय सामंत यांनी माहितीची घोषणा केली असती तरी अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला नाही त्यामुळे तिढा कायम असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच आमदार शेखर निकम नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे तर आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह दिसत आहेत दोन दिवसात सारे चित्र स्पष्ट होणार असले तरी नगराध्यक्ष पदाची खरी रंगत चिपळूणमध्ये पाहायला मिळणार आहे.









