मांडवी येथे वृध्दाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मांडवी-सदानंदवाडी रस्त्यावर निष्काळजीपणे दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या दुचाकी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव हेमंत सुर्वे (वय ३२ रा. मांडवी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ६) रात्री साडेआठच्या सुमारास मांडवी-सदानंदवाडी येथील रॅम्पपुढील रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वैभव सुर्वे गुरुवारी रात्री दुचाकी (एमएच-0८ बीएच – ७७२८) सोबत पाठीमागे दिपक जगन्नाथ शिवलकर (वय ६०, रा. मांडवी, रत्नागिरी) यांना घेऊन मांडवी ते मिरकरवाडा रस्त्याने जात होते. तो मांडवी सदानंदवाडी येथील रॅम्प पुढील रस्त्यावर आला असता त्यांचा भरधाव दुचाकीवरील ताबा सूटला आणि रस्त्याच्या विरुध्द दिशेला जावून समोरुन येणाऱ्या दुसरी दुचाकी (क्र. एमएच-०८-बीडी-४९९१ ) ला समोरुन धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सौबान नुरुद्दीन जयगडकर (२३) आणि समनुन खलील मजगावर (२३ ,दोन्ही रा. पांजरी मोहल्ला,रत्नागिरी) हे जखमी झाले. तर बुलेटवर मागे बसलेल्या दिपक शिवलकर यांचा मृत्यू झाला.