रत्नागिरीच्या नाट्यक्षेत्राला धक्का, नाट्यकलावंत, सांस्कृतिक क्षेत्रातून हळहळ
रत्नागिरी:-रत्नागिरीतील प्रसिद्ध नाट्य निर्माते किशोर सावंत यांचे गुरुवार 3 सप्टेंबर रोजी सकाळी मुंबईमध्ये कोरोनाने निधन झाले. दुर्दैवी बाब म्हणजे बुधवारी सकाळी त्यांच्या पत्नीचेही बॉम्बे हॉस्पिटल येथे कोरोनावर उपचार सुरु असताना निधन झाले.
रत्नागिरीत गेली सुमारे 30 वर्षांहून अधिक कालावधी त्यांनी रत्नागिरीकराना दिग्गज नाट्यकलावंतांची विविध प्रकारची नाटके रत्नागिरीतील नाट्यगृहात आणून रत्नागिरीकरांचे मनोरंजन केले. “यशश्री करंडक” स्पर्धेद्वारे रत्नागिरीतील युवा नाट्यकलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. रत्नागिरीतील सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे.
किशोर सावंत यांच्या निधनाने रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्राला, नाट्यक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता प्रफुल्ल घाग यांनी आम्ही याप्रसंगी नियतीपुढे हतबल होऊन काही करू शकत नसल्याबद्दल खंत व्यक्त करत किशोर सावंत व त्यांच्या पत्नीला श्रद्धांजली अर्पण केली.









