आंबेशेत येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. विशाखा विश्वास नागवेकर (वय ६२, रा. आंबेशेत, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २१) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विशाखा यांना ह्दयाचा आजार होता. दोन महिन्यापूर्वी त्यांच्या उपचार ही झाले होते. घरी असताना त्यांना अचानक खोकला आला व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. उलटी झाली. नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद कऱण्यात आली आहे.