Thursday, May 7, 2026
spot_img
Home चिपळूण चिपळूण तालुक्यात तिघांची आत्महत्या

चिपळूण तालुक्यात तिघांची आत्महत्या

चिपळूण:- चिपळूण तालुक्यात आत्महत्या करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी एका प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना घडलेली असतानाच सोमवारी सावर्डे परिसरात आणखी दोघांनी आत्महत्या केल्याचे प्रकार पुढे आले आहेत.

रविवारी (ता. १४) नीलेश यशवंत भोसले यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला आहे. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्या पाठोपाठ सावर्डे-उदेगवाडी येथील जयराम कृष्णा लाहीम (६०) यांनी सोमवारी घरी कोणी नसताना लाकडी भालाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० दरम्यान घडली. वहाळ घडशीवाडी येथील सौरभ संदीप भागडे (२५) या तरुणाने अंगणातील शेडच्या लोखंडी बारला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबतची तक्रार सौरभ भागडेचे चुलते संजय भागडे यांनी दिली आहे. या दोन्ही घटनांबाबत सावर्डे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.