तापाने आजारी असलेल्या  उद्यमनगर येथील तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- तापाने आजारी असलेल्या तरुणाला खासगी दवाखान्यात उपचार घेऊन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यश प्रकाश आखाडे (वय २२, रा. उद्यमनगर, पटवर्धनवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता.३१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यश आखाडे याला दोन दिवस ताप येत होता म्हणून उद्यमनगर येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले. त्यानंतर अचानक त्याला घाम येवून बेशुद्ध पडला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.