जिल्ह्यात कोरोनाचे 75 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू 

रत्नागिरी:- नव्याने प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचे 75 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 हजार 716 वर पोचली आहे. तर मागील 24 तासात दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 129 इतकी झाली आहे.ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1 हजार 209 इतकी आहे. 

नव्याने सापडलेल्या 75 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट केलेले रत्नागिरीतील 20 रुग्ण, लांजा 8, राजापूर 2, कळंबणी 7, कामथे 10, दापोली  4, गुहागर मधील 1 रुग्ण आहे. याशिवाय ॲन्टीजेन  टेस्ट मधील रत्नागिरीतील 13 आणि खाजगी हॉस्पीटल मधील 10 असे एकूण 75 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.    

नव्याने 54 रुग्ण बरे झालेले आहेत. तर मागील 24 तासात दोघांचा बळी गेला आहे. यात चिपळूण तालुका येथील 1 रुग्ण आणि पावस, ता.रत्नागिरी येथील एका रुग्णाचा समावेश असून जिल्ह्यात आजपर्यंत एकूण मृत्यू 129 झाले आहेत.