चांदेराई बाजारपेठेत पाणी भरण्यास सुरुवात, दोन्ही बाजूची वाहतूक बंद

रत्नागिरी:- मागील चार दिवसापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातल्या सहा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. रत्नागिरीतील काजळी नदीने देखील आपले रौद्ररूप धारण केले आहे. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे.

रस्त्यावर पुराचे पाणी वाढू लागल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुराचे पाणी बाजारपेठेत भरण्यास सुरुवात झाल्याने येथील दुकानदारांनी आपला दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. रत्नागिरी जिल्हा असून मुसळधार ते मुसळधार पाऊस होणार आहे त्यामुळे येणारे 24 तास हे कोकणासाठी महत्त्वाचे असणार आहेत कामाव्यतिरिक्त कोणी बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.