रामआळीत कोरोनाचा शिरकाव; तब्बल 8 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- शहराची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या राम आळीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राम आळीत तब्बल 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

 राम आळीतील काल एकूण 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. याशिवाय आंबेशेत मध्ये 1, एमआयडीसी 4 आणि गोळप तसेच अन्य 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे.