पतीवर चाकूने वार; माजी सभापती विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- पतीवर चाकूने वार केल्या प्रकरणी रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
 

स्वप्नाली सुकांत सावंत असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे पती सुकांत गजानन सावंत ( 43, रा. सडामीऱ्या) यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार स्वप्नाली सावन्त या काही दिवसांपासून कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. त्याबाबत फिर्यादी सुकांत सावंत यांनी विचारणा केली असता याचा राग आल्याने आरोपी स्वप्नाली सावंत यांनी चाकूने सुकांत सावंत यांच्या उजव्या हातावर वार केला. यामुळे त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात भादवि कलम 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.