Saturday, May 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी हातखंबा अपघात प्रकरणी ‘त्या’ टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा

हातखंबा अपघात प्रकरणी ‘त्या’ टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- हातखंबा गाव येथील हायस्कूलच्या वळणावर टॅन्कर निष्काळजीपणे चालवून समोरच्या टेम्पो ट्रॅव्हलरला ठोकर देऊन अपघात करणाऱ्या टॅन्कर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद अबुतागीर ओलीस (वय ६२, रा. कुलमानस्ट्रीट अलिनाग्राम ठेणी, तामिळनाडू) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ४) सकाळी नऊच्या सुमारास हातखंबा-गाव येथील हायस्कूलजवळील वळणावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालक टॅन्कर (क्र. के.ए.-०१ एजी ८४४७) घेऊन जयगड ते बेंगलोर येथे जात असताना टॅन्कर निष्काळजीपणे चालवून हातखंबा- हायस्कूलजवळील वळणावर समोरुन येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला ठोकर देऊन अपघात केला. या प्रकऱणी पोलिस पाटील शर्वरी सनगरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.