रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे येथील एक तरुण पुणे येथून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. गणेश प्रकाश कदम (वय २७, रा. नाचणे, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या शोधासाठी नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच, नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कदम हा पुणे शहरातून बेपत्ता झाला आहे. तो घरातून निघताना निळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान करून गेला आहे. गणेशच्या बेपत्ता होण्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत असून, नातेवाईकांनी तात्काळ याविषयी पोलिसांना माहिती दिली आहे.
या तरुणाबद्दल कोणालाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन नातेवाईकांनी केले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गणेश लवकर सापडावा अशी आशा व्यक्त केली जात आहे.