उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास
रत्नागिरी:- वाटदमध्ये शस्त्र बनविणारा कारखाना येणार आहे. पाकिस्तानला हरवण्यासाठी लागणारे शस्त्र वाटदमध्ये होणार याचा अभिमान असायला हवा. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल. प्रकल्पांना पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. येथील कोणत्याही मंदिर, घराला हात लावणार नाही. सर्वात जास्त जमिनीला भाव, रोजगार, कराराच्या पलीकडे जाऊन काम देऊ. शेतकरी माझा केंद्रबिंदू आहे, अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.
शेतकरी, जमीन मालक, व्यापारी यांची वाटद एमआयडीसीच्या जन प्रबोधन सभेत बोलत होते.
यावेळी बागायतदार काका मुळे, बाळ जोग, बाबू पाटील, कोळवणकर, मधुसूदन वैद्य आदी उपस्थित होते.
डॉ. सामंत म्हणाले, कोणती सभा झाली म्हणून आलो नाही. शेतकऱ्यांनी विनंती केली म्हणून आलो,
आमदार म्हणून आलो. घरच्या माणसांचे नुकसान होणार नाही हे बाहेरच्यापेक्षा मला माहित आहे. काहींचा विघ्न आणायचे म्हणून प्रयत्न सुरू आहेत.
प्रदूषणविरहित कारखान्यांचे समर्थन केले याचा अभिमान आहे. कंपनी काय हे माहित पाहिजे. बॉम्ब किंवा अन्य काही नाही. रोजगार नसल्याने ४० टक्के घर बंद आहेत. आपली मुलं आपल्या आईवडीलासमोर नोकरी करावीत यासाठी हा प्रकल्प आणतोय.
ज्या सैन्याबद्दल अभिमान आहे. शस्त्र बनविणारा हा कारखाना आहे. पाकिस्तानला हरविण्यासाठी जे शस्त्र लागणार ते आपल्या वाटदमधे होणार. शेतकऱ्यांना धन्यवाद,सर्व शेतकरी व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला.
दिल्लीत जेवढी चर्चा नाही तेवढी खंडाळा नाक्यावर होते. कंपनीला ब्लॅकमेल करणारे कोण आहेत हे देखील माहित आहे. परंतु गैरसमज पसरवले जात आहेत. या जिल्हा परिषद गटात सुखशांती यावी यासाठी प्रयत्न करत आहेत. १००० एकर जमीन का घेतली, कारण ३०० एकरमध्ये प्रकल्प होणार आहे. उर्वरित सुरक्षेसाठी बफर झोन असेल. ही जमीन एमआयडीसी नाही तर कंपनीच्या पैशाने जमीन घेणार आहे. तुम्हाला विश्वासात घेऊ प्रकल्प करण्यासाठी आलोय. विरोधकांशीही चर्चा करणार, असे त्यांनी नमूद केले.