अशैक्षणिक बी. एल.ओ. कामातून शिक्षकांना मुक्त करा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ कामातून मुक्त करावे या मागणीचे निवेदन सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी २२ फेब्रुवारी २००५ रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना दिलेल्या आदेशानुसार, प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामासाठी नियुक्ती करू नये असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्राथमिक वर्गांतील शिक्षकांकरिता विद्यार्थी प्रमाणे ३० शिक्षक संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.

अशैक्षणिक कामासाठी नियुक्ति केल्यास मनाई करण्यात आलेली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक वर्गातील शिक्षकांची किमान २०० दिवस आणि उच्च प्राथमिक वर्गांतील किमान २२० दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे. जेणेकरून मुलांना गुणवत्तेचे व दर्जेदार शिक्षण मिळेल. प्राथमिक शिक्षकांना मतदान नोंदणी, मतदार यादी दुरुस्ती, जनगणना, निवडणूक कामे, बालकांचे शालेय नोंदणी शिक्षण क्रिडा स्पर्धा मिळून २३ प्रकारचे कामे करावी लागतात. यामध्ये नियुक्ती झालेल्या शिक्षकांवर ही कामे लादण्यात येत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता अशैक्षणिक कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी राज्यकार्याध्यक्ष संतोष कदम,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय गराटे,सत्यजित पाटील, दिलीप तारवे, संतोष
रावणंग,मनेष शिंदे, अशोक सुर्वे, रवींद्र कुळये, राजेश सोहनी,मंगेश मोरे, नानासाहेब गोरड,मनोजकुमार खानविलकर, निलेश देवकर,सतीश मुणगेकर,महेंद्र रेडेकर, उपस्थित होते.