रत्नागिरी:- ह्दयविकाराच्या आजाराने चार वर्षे आजारी असलेली वृद्ध महिला तोल जावून पडली. तिच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. अंजली गंगाधर लिंगायत (वय ७०, रा. लक्ष्मी प्रसाद अपार्टमेंट, जोशी-पाळंद, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २०) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या महितीनुसार अंजली या चार वर्षापासून ह्दयविकाराचा आजार होता. रविवारी रुमच्या हॉलमध्ये बसल्या असताना त्यांचा तोल जाऊन पडल्या त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.