रत्नागिरी:- तालुक्यातील साठरेबांबर फाटा, गयाळवाडी रेल्वेब्रीज या सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तिघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल दत्ताराम ताम्हणकर (वय ३८, रा. ताम्हणकरवाडी, कशेळी, रत्नागिरी), प्रसाद श्रीराम कोकजे (वय ४०, रा. निवळी कोकजेवाडी, रत्नागिरी), संतोष धर्माची डांगे (वय ५१, रा. हातखंबा-डांगेवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना १६ व १७ जुलै दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेसातच्या सुमारास साठरेबाबंर फाटा, गयाळवाडी रेल्वेब्रीज येथे निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांकडे मद्यपान करण्याचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुर्याजी पाटील, पोलिस हवालदार रुपेश भिसे, लक्ष्मण कोकरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.