राजापूर:- तालुक्यातील नाणार आणि सागवे भागामध्ये ऑटोमोबाईल हब उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. नाणार आणि सागवे भागातील काही जमिनींची पाहणीही नुकतीच करण्यात आल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या भागात लवकरच ऑटोमोबाईल उद्योग साकारण्यात येईल, अशी शक्यता आहे. या प्रकल्पामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून उद्योगधंद्यांचा बाबतीत सरकार आता जनमताचा कौल ऐकणार असंच चित्र आहे.
कोकणवासीयांसाठी एक दिलासादायक आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे परिसरात प्रदुषणमुक्त ऑटोमोबाईल हब उभारण्यास केंद्र सरकारने अखेर हिरवा कंदील दिला आहे. विशेष म्हणजे, कोकणवासीयांनी अनेक वर्षांपासून प्रदूषणकारी प्रकल्पांऐवजी पर्यावरणपूरक उद्योगांची मागणी केली होती. हीच मागणी केंद्र सरकारने मान्य करत प्रदूषण विरहित आणि रोजगार देणाऱ्या प्रकल्पास प्राधान्य दिले आहे. नाणार आणि सागवे भागातील काही जमिनींची पाहणीही नुकतीच करण्यात आल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या भागात लवकरच ऑटोमोबाईल उद्योग साकारण्यात येईल, अशी शक्यता आहे.
या प्रकल्पामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून स्थानिक तरुणांना उद्योगधंद्यांमध्ये संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यापूर्वी नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र स्थानिक जनतेने त्याला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे यावेळी प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक प्रकल्पाची मागणी करण्यात आली होती. कोकणवासीयांच्या या रास्त मागणीला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने स्थानिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. यामुळे कोकणातील निसर्गसंपत्ती आणि पर्यावरणाचे रक्षण होऊन विकासाची नवीन दिशा मिळणार असल्याची चर्चा आहे.