Friday, May 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची पदोन्नतीने बदली

अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची पदोन्नतीने बदली

संभाजीनगर येथे राज्य गुप्त वार्ता विभाग उपआयुक्तपदी बढती

रत्नागिरी:- रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची छत्रपती संभाजी नगरमध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपआयुक्तपदी बढतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता बुलढाणा येथील बाबुराव महामुनी रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षकपदी रुजू होणार आहेत.
     जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरी येथे अपर पोलीस अधीक्षकपदी मागील अडीच वर्षे कार्यभार उत्तम पद्धतीने सांभाळल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. त्यातही बारसु प्रकल्पासह इतर बंदोबस्तात चोख कामगिरी बजावल्याचे सांगण्यात येत आहे. अतिशय अभ्यासू, तितक्याच शिस्तप्रिय आणि आपल्या कार्याबाबत अतिशय दक्ष अशा प्रकारच्या अधिकारी त्यांनी आपली ओळख जनसामान्यांमध्ये निर्माण केली. त्यांच्या बदलीमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांच्या बढतीसाठी शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आला आहे.