जिल्ह्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीचे होणार ‘जिओ टॅगिंग’

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्य़ालाही यावर्षी विविध विभागांना वृक्षलागवडीचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. रत्नागिरी सामाजिक वनीकरण विभागाला 1 लाखांचे उद्दीष्ट आहे. पण आता लागवड होणाऱया या वृक्ष लागवडीचे ‘जिओ टॅगिंग’ करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे प्रत्येक रोपांची लागवडी नोंद करण्यात येणार आहे.

राज्यातील वनक्षेत्र वाढवण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत यावर्षी 10 कोटी झाडे लावण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्य़ातही नियोजन सुरू आहे. वृक्षारोपण ही लोकचळवळ होउन ही मोहीम यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील 33 टक्के वनाच्छदनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढील 20 वर्षे हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र हे अभियान मोहिम स्वरुपात राबविण्यात येणार आहे.

10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी सर्व विभागांनी जागा तसेच दर्जेदार रोपे निश्चित करावीत. वृक्षारोपण मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदांनी सहभाग घ्यावा. तसेच सामाजिक संस्थांनाही यामध्ये सहभागी करून घ्यावे. त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आवश्यक आणि दर्जेदार रोपे मिळावीत, यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत असलेल्या जिल्ह्य़ातील नर्सरींमध्ये 6 लाख विविध वृक्ष रोपांची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत वृक्षलागवडीकडे लक्ष देण्यात येणार आहे. मात्र त्यावेळी केल्या जाणाऱया वृक्षलागवडो ‘जिओ टॅगिंग’ केले जाणार आहे. यावेळेस सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षलागवड प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कडेला, बांधकाम विभागाया रस्त्यांच्या कडेला, तसा सार्वजनिक जागेवर करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी त्या त्या विभागांना पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.