Thursday, May 7, 2026
spot_img
Home रत्नागिरी कोकण रेल्वेगाड्यांचा वेग आजपासून मंदावणार

कोकण रेल्वेगाड्यांचा वेग आजपासून मंदावणार

खेड:- कोकण मार्गावर पावसाळी वेळापत्रकाचे आज १५ जूनपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे २० ऑक्टोबरपर्यंत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावणार असून प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागणार आहे.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थतीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी, वेर्णा, मडगाव, कारवार, उडुपी येथे वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार आहेत. ‘आव्हानात्मक हवामानाच्या काळात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विभागीय वेग समायोजित केला जाणार आहे. पर्जन्यवृष्टी

झाल्यानंतर रेल्वेगाड्या ताशी ४० कि.मी.च्या वेगाने हाकण्याच्या सूचना लोकोपायलटना करण्यात आल्या आहेत. दरवर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू होते. यंदा हा कालावधी कमी करण्यात आला असून २० ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार रेल्वेगाड्या धावणार आहेत. रोहा ते ठोकूरपर्यंत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावणार आहे.