वाटद-खंडाळा येथील कामगाराचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील चिकन सेन्टरमध्ये सात ते आठ दिवस कामाला असलेल्या वृद्धाचा आकस्मिक मृत्यू झाला.
रंजन गजानन बागकर (वय ६७, मुळ रा. करसगाव, ता. दापोली-रत्नागिरी, सध्या रा. वाटद-खंडाळा, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना
सोमवारी (१९) दुपारी सव्वातीनच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध रंजन बागकर हे वाटद-खंडाळा येथील एका चिकन सेन्टरमध्ये सात ते आठ दिवस कामाला होते. सोमवारी सकाळी खबर देणार यांनी त्याला आवाज दिला असता त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद, खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.