रत्नागिरी:- भर उन्हाळ्यात चालत्या वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वाहतूक अधिक धोकादायक बनली आहे. आज बुधवार सकाळी जाकादेवी नजीकच्या राई भातगांव मार्गावर एक गॅसचा टँकर जळून खाक झाला.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही, याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध प्राप्त झालेली नाही. मात्र, या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत, असे वृत्त आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे वाहनांचे टायर फुटणे किंवा इंजिन गरम होऊन आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच आता गॅस टँकरसारख्या वाहनाला आग लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर अधिक तपासणी करून नुकसानीचा अंदाज घेतील.