४-५ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज
रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातखंबा बोंबलेवाडी गिरदा येथील जंगलमय परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह सुमारे ४ ते ५ दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
याबाबतची खबर हातखंबा येथील पोलीस पाटील यांनी ७ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता दिली. त्यांनी गणपत डांगे नावाच्या व्यक्तीकडून माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिथे त्यांना अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. त्याचे नाव आणि गाव समजू शकलेले नाही. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या घटनेची नोंद अम्यु. क्रमांक ३७/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.









