रत्नागिरी:- राज्य सरकारने कोकण रेल्वे मार्गावर 162 गणेशोत्सव विशेष गाड्या चालविण्यास मध्य रेल्वेला कालच परवानगी दिली होती; याशिवाय 17 ऑगस्टपासून 31 ऑगस्ट या कालावधीत कोकण रेल्वेच्या आणखी 20 रेल्वे या मार्गावर धावतील. आता 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत एकूण 182 गाड्या धावणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते रत्नागिरी गाडी 15 ते 22 ऑगस्ट आठ फेर्या आणि 16 ते 23 ऑगस्ट 8 फेर्या, मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड प्रत्येकी 16 फेर्या, सीएसएमटी ते सावंतवाडी रोड सोळा फेर्या, लोकमान्य टिळकक टर्मिनन्स ते कुडाळ 15 ते 23 ऑगस्ट 16 फेर्या, लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते सावंतवाडी रोड 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 26 फेर्या,
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 24 फेर्या, लोकमान्य टिळक ते रत्नागिरी 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत धावणार आहेत.
पहिली गाडी 15 ऑगस्टला सकाळी 4.30 वाजता चाकरमान्यांना घेऊन रत्नागिरी स्थानकात दाखल होईल.
या चाकरमान्यांची कडक तपासणी करण्यासाठी महसूल, आरोग्य व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचे नियोजन या यंत्रणेच्या माध्यामातून सुरु झाले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरणार्या प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तर 50 वर्षावरील व्यक्तीची अँटीजेन तपासणी केली जाणार आहे. येणार्या प्रत्येकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक घेतला जाणार असून मला कोणताही आजार नाही अशा हमीपत्रावर प्रवाशाची सही घेण्यात येणार आहे. तिकीट कन्फर्म असेल तर गाडीत प्रवाशांना जागा मिळणार आहे.