जिल्ह्यात 96 नवे पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू

रत्नागिरी:- मंगळवार सायंकाळपासून जिल्ह्यात 96 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 487 झाली आहे. याशिवाय रत्नागिरी तालुक्यातील 3 तर चिपळूण येथील 1 अशा 4 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा 87 वर पोचला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे  प्रमाण 3.49 टक्के आहे.

आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 10, कोव्हीड केअर सेंटर घरडा 5, उपजिल्हा रुग्णालय कळबणी 2, उपजिल्हा रुग्णालय कामथे 2 अशा 19 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1616  झाली आहे.

नव्याने सापडलेल्या 96 नव्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 25, दापोली 13, कामथे 21, गुहागर 26, देवरुख 5, लांजा 1 आणि खाजगी प्रयोगशाळा (चिपळूण – 1, खेड- 4) 5 रुग्णांचा समावेश आहे.
   

बुधवारी प्राप्त झालेल्य माहितीनुसार 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील 53 वर्षीय महिला रुग्ण, शिवाजीनगर, रत्नागिरी येथील 68 वर्षीय महिला रुग्णांचा तसेच  पुर्णगड, रत्नागिरी येथील  61 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच  खेर्डी, चिपळूण येथील 86 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू  झाला आहे.त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 87 झाली आहे.