रत्नागिरी चंपक मैदान येथील घटना
रत्नागिरी:- शहरानजीकच चंपक मैदान येथे आंबे काढत असताना तेथील विद्युत तारेला घळाचा स्पर्श लागून शॉक लागलेल्या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार 5 एप्रिल रोजी सकाळी 8.45 वा. सुमारास घडली.
महेश राजू इलम (30, रा.पोसरे खेड,रत्नागिरी) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. महेश इलम हा अनिल नार्वेकर यांच्याकडे कामाला होता. शनिवारी सकाळी तो चंपक मैदान येथील आंब्याच्या झाडावरील आंबे काढत होता. त्यावेळी त्याच्या हातातील घळाचा स्पर्श झाडाच्या बाजूनेच जाणार्या विद्युत तारेला झाला. त्यामुळे महेशला शॉक लागून तो थरथरु लागला. ही बाब त्याच्या सहकार्यांच्या लक्षात येताच त्यांनी महेशला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी महेशल तपासून मृत घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिकम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.