रत्नागिरी:- सोमवारी सायंकाळपासून जिल्ह्यात 101 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 391 झाली आहे. तसेच 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृत्यूसंख्या 83 इतकी झाली आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील तब्बल 46, दापोली 8, कळंबणी 6, कामथे-27 आणि अँटीजेन टेस्ट केलेले 14 रुग्ण आहेत.
मंगळवारी प्राप्त झालेल्य माहितीनुसार 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. खेड तालुक्यातील पुरेखुर्द येथील 49 वर्षीय जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे मृत्यु झाला. चाकाळे ता.खेड येथील 66 वर्षाच्या रुग्णांचा रत्नागिरी येथे दाखल करण्यास आणत असताना प्रवासादरम्याने मृत्यू झाला. हर्णे ता. दापोली येथील 70 वर्षीय रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 83 झाली आहे.