चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी 10 दिवसांचाच: ना. उदय सामंत

रत्नागिरी:- यंदाच्या गणेशोत्सव कोरोना काळात होत आहे. या पार्श्वभूमीवर गावाकडे येणाऱ्या चाकारमान्यांना चांगले वागवणे आवश्यक आहे. त्याबाबत ग्रामपंचायतींनी सकारात्मक भूमिका ठेवावी तसेच कोरोनाचा फैलाव होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. ग्रामीण भागात येणाऱ्या चाकरमान्यांना 10 दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हाच निर्णय अंतिम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गणोशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. याच प्रकारच्या सूचना गणेश स्थापना व विसर्जन तसेच गौरीच्या सणासाठी दिल्या जाणार आहेत. सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ग्रामीण भागात येणाऱ्या चाकरमान्यांना 10 दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय अंतिम आहे. यासाठी ग्रामपंचायतीला वेगळे निर्णय करता येणार नाहीत असे सामंत यांनी स्पष्ट केले. काही ग्रामपंचायतीनी 14 दिवसांचे ठराव घेतले त्याबाबत ते बोलत होते.