मारुती मंदिर येथील तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर येथील नवकार प्लाझा येथील कर्नाटक मधील तरुणाने गळफास घेतला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. प्रदिप धर्माप्पा बल्याणअली (वय ३४, रा. नवकार प्लाझा, मारुती मंदिर, रत्नागिरी. मुळ ः कर्नाटक) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १०) सकाळी सव्वादहाच्या पुर्वी निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप बल्याणअली याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून रुमच्या छताच्या फॅनला साडी बांधून आत्महत्या केली. सकाळी खबर देणार दिपेश श्रीपत मांडवकर हे त्यांच्या रुममध्ये पहायला गेले होते. खिडकीतून पाहिले असता प्रदीप यांनी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. तात्काळ त्यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.