रत्नागिरी:- फणसवणे (ता. संगमेश्वर) येथील बाजारपेठ येथे वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महमुद इसा बागवान (५१, रा. भोगाळे, चिंचनाका, ता चिपळूण) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी सात च्या सुमारास फणसवणे बाजारपेठ नाका येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा येथील सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बागवान यांनी रिक्षा टेम्पो (क्र. एमएच-०८ एपी १३३२) हा फणसवणे बाजारपेठ येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा फणसवणे रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होईल असे पार्क केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल विनय मनवल यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.