रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी कोकजेवठार येथे अचानक नॅनो कारने पेट घेतला. ही घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. सुदैवाने कारचालकाने प्रसंगावधान राखून वेळीच कार थाबवली. त्यामुळे आतील प्रवाशांना सुखरुप बाहेर पडता आले. एमआयडीसी अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीमध्ये कार संपूर्ण जळून खाक झाली.
नॅनो कार ही रविवारी मुंबई- गोवा महामार्गावरील कोकजेवठार येथून जात होती. सकाळी ११ च्या सुमारास कारमधून अचानक धुरु येण्यास सुरुवात झाली. यावेळी चालकाला काहीतरी गडबड… असल्याचा संशय आल्याने त्यानें रस्त्याकडेलाच कार उभी केली तसेच आतील प्रवाशांना बाहेर पडण्यास सांगितले. कारमधून प्रवासी बाहेर पडताच काही क्षणात कारने पेट घेण्यास सुरुवात केली. सकाळी असलेल्या वाऱ्यामुळे आगीचे स्वरुप वाढत गेले. यावेळी रत्नागिरीतून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाच्या व स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली आग नेमकी कशामुळे लागली होती, हे अद्याप समोर आले नाही.









